सोलापूर,दि.4: Lok Sabha Result: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत परतणार का? विरोधी भारत ब्लॉक पंतप्रधान मोदींशी स्पर्धा करू शकेल का? किंवा काही नवीन आश्चर्य असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळतील. कारण लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडली.
सोलापूरमधून प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. महायुतीचे राम सातपुते पिछाडीवर पडले आहेत.
बीडमधून पंकजा मुंडेंनी प्राथमिक कलामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे तर दुसरीकडे रावेरमधून रक्षा खडसे आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.
44 ठिकाणाचे प्राथमिक कल हाती आले आहेत. महाविकास आघाडी 26 जागांवर आघाडीवर दिसत आहे. दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारांनाही 22 जागांवर आघाडी मिळाल्याचं दिसत आहे.