Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का?

0

मुंबई,दि.6: Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 ची तयारी भाजपा व विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचे अनेक स्तरावर कौतुक करण्यात आले होते. अशातच उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,” याविषयी आता भाकीत करणं सोपं नाही. राजकरणात काही घडू शकतं.”

विरोधी पक्षामध्ये प्रमुख चेहरे आहेत त्यात उद्धव ठाकरे… | Lok Sabha Election 2024

याबाबत बोलताना संजय राऊत (sanjay raut) पुढे म्हणाले, ”उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे एक उत्तम चेहरा आहेत. महाविकास आघाडीने ठरवलं होत की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतील तरच आपण एकत्र येऊ आणि सरकार बनलं. आज जे विरोधी पक्षामध्ये प्रमुख चेहरे आहेत, त्यात उद्धव ठाकरे यांचा चेहरा अधिक महत्वाचा आहे.” ते म्हणाले, ”महाराष्ट्र मोठं राज्य आहे. ते ठाकरे असून हिंदुत्ववादी आहेत. मात्र पंतप्रधानपदासाठी या देशाला मुख्य चेहरा कोण असेल, यापेक्षा एकत्रित येणं गरजचं आहे. पंतप्रधान (Opposition Party Prime Minister Face Off 20224 Election) कोण असेल, हे नंतर ठरवता येईल. मात्र आधी एकत्र येऊन निवडणूक लढवणं महत्वाचं आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचा जो भर आहे, तो सगळ्यांनी एकत्र येण्यावर आहे. पंतप्रधान कोण हे आपण नंतर पाहू असंही ते म्हणाले.”

…उद्धव ठाकरे पुढाकार घेत आहेत

संजय राऊत (sanjay raut) म्हणाले, विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) पुढाकार घेत आहेत. ही 24 तासात पार पडणारी प्रक्रिया नाही. शरद पवार (sharad pawar) देखील त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. चंद्रशेखरराव हे देखील यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने यासाठी प्रयत्न करत असून या सगळ्यांचा नेता लगेच ठरणार नाही. सगळे एकत्र बसल्यावर देखील नेता ठरवायला वेळ लागणारच.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here