लाडकी बहीण योजना, सोलापुरात इतक्या महिलांच्या अर्जाना मंजुरी

0

सोलापूर,दि.३: राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये ६ लाख १० हजार अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी तहसील समितीच्या पातळीवर छाननी करून एक लाख अर्ज मंजूर केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली आहे.

राज्य शासनाने राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना प्रतिमहिना दीड हजार रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये सहा लाख दहा हजार ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल झाले आहेत. तसेच ऑफलाइन अर्जाची संख्या देखील मोठी आहे.

ऑफलाइन अर्ज ऑनलाइनवर अपलोड केले जात आहेत. ६ लाख १० हजार ऑनलाइन अर्जापैकी शुक्रवारपर्यंत तहसील पातळीवरील समितीने एक लाख प्रकरणांना मंजुरी दिली आहे. आता ही प्रकरणे जिल्हा पातळीवरील समितीकडे दाखल केले आहेत. जिल्हा समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर साधारण रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार असल्याची माहिती कुंभार यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या योजनेचे काम झाले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. परंतु मोबाइलवरील नारीशक्ती दूत अॅप धिम्या गतीने चालत आहे. गेल्या चार दिवसांपासून तर ते अॅप बंदच असल्याने अंगणवाडी सेविका वैतागल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here