मुंबई,दि.१२: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर जितेंद्र आव्हाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागणार असल्याचे विधान आव्हाड यांनी केले आहे. निकाल तुमच्या बाजुने लागलाय आमचे काही म्हणणे नाही. सर्वोच्च न्यायालयाने पक्षातील फूट मान्य नाही असे का म्हटले. सर्वोच्च न्यायालय खूप गंभीर आहे. दिल्लीचा जो निकाल दिलाय, तेव्हा कोर्टाने सांगितलेले तात्काळ सुनावणी होईल. महाराष्ट्रातही शिंदे सरकार अपात्रतेचा मुद्दा एक वर्ष खेचतील असे काही होणार नाही, असे सांगत महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
सारा अली खानचं वय बघा: जितेंद्र आव्हाड
पत्रकारांनी आव्हाडांना सारा अली खानच्या केदारनाथ दौऱ्यावरही छेडले. तेव्हा आव्हाड म्हणाले की, सारा अली खानचं वय बघा, ती कोणत्या परिस्थितीत वाढलीय ते पहा. एखादा व्यक्ती जर जात असेल तर वैय़क्तीक स्तरावर जाण्याची गरज नाही. आमच्यामागे ट्रोल लागतात त्यांचा विचार केला तर रोज १०० गुन्हे दाखल होतील, त्यामुळे ट्रोलकडे लक्ष द्यायचे नाही, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर जितेंद्र आव्हाड
ज्यांना राजकारणात शरद पवार यांनी आणले त्यांनी पवारांच्या नैतिकतेवर बोलावे, हे कठीण आहे. कोर्टाने १४१ पानांची रुल बुक दिली आहे. त्यानुसार चालावे लागणार त्यामुळे जर तर अर्थ नाही. अपात्रतेचा अर्ज टाकला त्या दिवशीचा विचार करायचा हे स्पष्ट म्हटले आहे. तेव्हाचा राजकीय पक्ष शिवसेना होती पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे होते. न्यायालयानेच विधी मंडळ पक्ष महत्वाचा नाही असे म्हटले आहे, असे आव्हाड म्हणाले.
व्हीप हा पक्षप्रमुख नेमतो यानुसार
व्हीप हा पक्षप्रमुख नेमतो. यानुसार सुनील प्रभूंचा व्हीप लागू होतो. यावर चर्चा करण्यात अर्थ नाही लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. माझ्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणुक लागणार आहेत. म्हणजे तो गेला आहे फक्त जाहीर करायचे माहित नाही, अशी त्यांची अवस्था असल्याची टीका आव्हाड यांनी केली. परमबीर सिंहांच्या निलंबनावर बोलताना इतका कर्तव्यदक्ष अधिकारी आहे त्यावर काय बोलायला लावता, असा टोला लगावला.