मुंबई,दि.11:Jairam Ramesh On BJP: भाजपाची स्थिती दक्षिणेत साफ तर उत्तरेत हाफ अशी होईल असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले. मतदानाची आकडेवारी जनतेचा कौल इंडिया आघाडीच्या बाजूने असल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तीन टप्प्यांतील मतदानानंतर सर्व काही स्वच्छ दिसत आहे. दक्षिणेत साफ तर उत्तरेत हाफ अशी भाजपाची स्थिती होणार आहे, असे जयराम रमेश म्हणाले.
2004 सारखी स्थिती 2024 मध्ये असेल याकडे त्यांनी लक्ष वेधले. ही निवडणूक ऐतिहासिक असून इंडिया आघाडीचेच सरकार येईल, असेही ते म्हणाले. इंडिया आघाडी पुढच्या टप्प्यापर्यंत बहुमताच्या आकडय़ाजवळ पोहोचलेली असेल, असा विश्वासही जयराम रमेश यांनी व्यक्त केला.
भाजपाची दक्षिणेत साफ तर उत्तरेत हाफ अशी स्थिती
19 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यानंतरच भाजपाची दक्षिणेत साफ तर उत्तरेत हाफ अशी स्थिती होईल हे चित्र स्पष्ट झाले होते, असे ते म्हणाले. 27 एप्रिलच्या दुसऱया टप्प्यानंतर भाजपा दक्षिणेकडे पूर्णपणे साफ होईल तर उत्तर आणि मध्य हिंदुस्थानात 2019 च्या तुलनेत भाजपाचे संख्याबळ अर्धे होईल, असेही ते म्हणाले. तीन टप्प्यांतील मतदानानंतर 2004 मध्ये जी स्थिती होती तशीच स्थिती 2024 मध्ये दिसेल, असे जयराम रमेश म्हणाले.