शासन निधी गैरवापर प्रकरण नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून चौकशी सुरू

0

सोलापूर,दि.17: भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या कथित शासन निधी गैरवापर प्रकरणाची चौकशी नगर परिषद प्रशासन संचालनालयाने सुरु केली आहे. याबाबत तक्रारदार जयराज नागणसुरे यांना ईमेलद्वारे माहिती देण्यात आली आहे. नागणसुरे यांनी आमदार देशमुख यांच्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासन निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा निधीचा गैरवापर करून सवर्ण वस्तीमध्ये निधी खर्च केल्याचा आरोप नागणसुरे यांनी केला होता.

निधी गैरवापर प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली आहे. मंगळवारी (दि.15) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागणसुरे यांना आठ दिवसांत पुरावे सादर करण्यास सांगितले होते. आता नगर परिषद प्रशासन संचालनालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. याबाबत तक्रारदार नागणसुरे यांना ईमेलद्वारे माहिती देण्यात आली आहे. नागणसुरे यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

6 वर्षे निवडणूक लढविता येणार नाही

काही नगरसेवक व त्यांचे नातेवाईक मक्तेदार आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 10 पालिका सदस्य होण्यास अनर्हता मधील कलम 1 मधील “फ ” पोट कलम (2) च्या तरतुदी नुसार अधिन तिचा महापालिकेबरोबर महापालिकेने किंवा महापालिकेच्या वतीने केलेल्या कोणत्याही करारात किंवा महापालिकेच्या नोकरीस तिचा स्वतः किंवा तिचा भागीदाराचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही भाग किंवा हित संबंध असेल तर या कलमान्वये नगरसेवक पदावर राहता येणार नाही व यापुढे 6 वर्षे निवडणूक लढविता येणार नाही, अशा 10 नगरसेवकावर वरील कारवाई करण्याची उच्च न्यायालयात मागणी केली आहे. असे नागणसुरे म्हणाले.

अस्वीकरण : बातमीतील दाव्याच्या सत्येतेची हमी सोलापूर वार्ता घेत नाही.

Disclaimer: Solapur Varta Does Not Guarantee The Truth Of The Claim Made By Jairaj Naganasure.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here