Corona: सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना रुग्ण संख्येत वाढ

0

सोलापूर,दि.9 : Corona: सोलापूर जिल्ह्यात कमी होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 62 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 175437 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 171546 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 214 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3677 झाली आहे. यात 2389 पुरुष व 1288 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 985 अहवाल प्राप्त झाले. यात 923 निगेटिव्ह तर 62 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 41 पुरुष आणि 21 महिलांचा समावेश आहे. आज 2 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 22 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here