सोलापूर शहर ५४ जणांनी केली कोरोनावर मात, शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या झाली १७१०

0

सोलापूर,दि.१९: सोलापूर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. चाचण्यांची संख्या कमी आहे तरी रुग्ण वाढ कायम आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत लस हे मोठे हत्यार आहे. सोलापूर शहर नवीन २२९ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या ३१३६४ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २८१८२ झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १७१० आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४७२ झाली आहे. यात ९३९ पुरुष व ५३३ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज १०२३ अहवाल प्राप्त झाले. यात ८०३ निगेटिव्ह तर २२९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात १३८ पुरुष आणि ९१ महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर ५४ बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here