छत्रपती संभाजीनगर,दि.1: Imtiaz Jaleel On Samriddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावर प्रतिक्रिया देताना AIMIM चे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) सिंधखेड राजा जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात एकूण 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने महाराष्ट्रावर शोकाकुळ पसरली आहे. दरम्यान आता या अपघातावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी बुलढाणा अपघातावरून (Buldhana Accident) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. हा अपघात नसून घात आहे. तसेच याला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघेही जबाबदार असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
Imtiaz Jaleel On Samriddhi Mahamarg Accident: ‘त्यामुळे हा अपघात नसून ही हत्या असून…
दरम्यान या अपघातावर प्रतिक्रिया देतांना जलील म्हणाले की, कोणताही एक्सप्रेस-वे किंवा सुपर एक्सप्रेस-वे तयार होतो त्यावेळी रोड सेफ्टीचे नियम असतात. त्यामुळे समृद्धी महामार्गबाबत रोड सेफ्टीचे क्लियरेंस मिळाले होते का?, या महामार्गावर नेहमीच अपघात का होतात?. मी फक्त याच अपघातबद्दल बोलत नाही. मात्र समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी मिडीया इव्हेंट करण्यात आला. उपमुख्यमंत्री फडणवीस गाडी चालवत आहे, त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री शिंदे बसले असल्याचे दाखवण्यात आले. या दोघांना फक्त काळजी याची वाटत होती की, आपली सत्ता गेल्यावर दुसरं कोणीतरी याचं उद्घाटन करेल. यासाठीच घाईघाईने या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आणि त्याचेच हे परिणाम आहे. त्यामुळे याला मी अपघात म्हणत नाही. ही हत्या असून, या हत्यांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघे जबाबदार असल्याचे जलील म्हणाले.
बुलढाणा येथे झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातास्थळी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांकडून अपघाताबाबत माहिती जाणून घेतली. सोबतच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अपघात झाल्यावर घटनास्थळी मदतीसाठी धावून आलेल्या स्थानिकांशी देखील चर्चा करत नेमकं काय घडलं होतं याबाबत जाणून घेतलं. तसेच अपघातस्थळाची पाहणी केल्यावर दोघेही नेते जखमी असलेल्या अपघातग्रस्तांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करणार आहे.