मराठा सेवा संघ शाखेतर्फ इफ्तार पार्टी व डॅा. आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम

0

सोलापूर,दि.28: जिल्हा परिषद मराठा सेवासंघ शाखेची बैठक होऊन एक एप्रिल रोजी रोजा इफ्तार पार्टी व 14 एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले असल्याची माहिती अविनाश गोडसे यांनी दिली.

रमजान ईदचे औचित्य साधून सोमवार दि. 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.30 वा.शिवरत्न सभागृहात रोजा इफ्तार कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे मराठा सेवा संघाच्या जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ईशाधीन शेळकंदे, अमोल जाधव, प्रसाद मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी, सुनिल कटकधोंड, संजय पारसे, कृषि अधिकारी परमेश्वर वाघमोडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, शिक्षणाघिकारी कादर शेख, सचिन जगताप, सुलभा वठारे, मराठा सेवा संघाचे केंद्रीय सदस्य उत्तमराव शेंडगे, मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष जी. के. देशमुख, टी. आर. पाटील, मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

तसेच रविवार दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 10. वा. यशवंतराव चव्हाण सभागृहात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त स्वानंद टिचर्स म्युजिकल ग्रुप मोहोळ प्रस्तुत भीम गीताचा कार्यक्रम आजोजित करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सचिन चव्हाण, राम जगदाळे, अनिल जगताप, सचिन जाधव, सचिन साळूंखे, अतुल सरडे, म.ज. मोरे, अभिमन्यू पवार, संजय सावंत , राम शिंदे प्रकाश शेंडगे,सुभाष कदम, सुहास चेळेकर, सुर्यकांत मोहिते, विठ्ठल मलपे,संतोष शिंदे, संजय पाटील,अजित देशमुख, महेश पाटील, नितीन जाधव, विशाल घोगरे, अनिल पाटील, भूषण काळे, संतोष शेळके,चेतन भोसले, प्रदिप सुपेकर, विकास भांगे, वासुदेव घाडगे, अविनाश भोसले,सुधाकर माने-देशमुख,राजू देशमुख, गणेश साळूंखे, सचिन पवार, उमेश खंडागळे, जयंत पाटील, जीवन भोसले, संतोष सातपुते, किरण शेळके, महेंद्र माने,अभिजीत निचळ, ऋषिकेश जाधव, रवि पाटील, गोपाळ शिंदे, हरिभाऊ देशमुख, नितीन पाटील, आनंद साठे, विष्णू पाटील, रोहीत घुले, सागर नागणे, निलेश खळदकर, कुलदीप खटके, नवनाथ रणसिंग,संकेत मस्के, ब्रम्हदेव पवार, सौरभ डोंगरे, विकास खंडागळे, रवि शेंडगे, प्रसाद काशीद, श्रीकांत माने,हणमंत गायकवाड, संतोष निळ, जयवंत जाधव, किरण देशमुख विनायक कदम, संजय चव्हाण, सुरेश साळुंखे, सुनिता भुसारे, आश्विनी सातपुते, सुचिता जाधव, ज्योत्सा साठे, उषा भोसले, अनुपमा पडवळे, भारती धुमाळ, अंजली पाटील, सविता मिसाळ, सोनल केत, सुरेखा सुपाते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here