सोलापूर,दि.1: जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयडल्स संस्थेचे संस्थापक कुणाल बाबरे यांच्या उपस्थितीत बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उत्सव अध्यक्ष श्रीशैल हिरेमठ, सुमित शिवशरण, आनंद बनसोडे, धीरज बंदपट्टे, कपिल बाबरे, रोहन गायकवाड, सूमो शिवशरण, नागेश कोप्पा, बंटी गायकवाड, अनिल बाबरे, अनिल विटकर व संस्थेचे सभासद उपस्थित होते.