IAS Anil Ramod: IAS अधिकारी अनिल रामोड यांना 8 लाख लाच घेताना रंगेहाथ पडकले

0

पुणे,दि.10: IAS Anil Ramod: अपर महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना अखेर सीबीआयकडून अटक करण्यात आली. 8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अनिल रामोड यांना CBI कडून अटक झाली. पुण्यात पहिल्यांदाच एका आयएएस अधिकाऱ्यावर लाचखोरीप्रकरणी सीबीआयच्या पथकाने छापा टाकला. काल पुण्यातील महसूल विभागाच्या त्यांच्या कार्यालयात सीबीआयने छापेमारी केली होती. त्यानंतर आता अनिल रामोड यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अनिल रामोड हे आयएएस अधिकारी आहेत. महसूल विभागात ते अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.

अनिल रामोड यांना अटक | IAS Anil Ramod

त्यांच्या घरातून तब्बल 6 कोटींची रोकड आणि स्थावर मालमत्तेची कागदपत्रे हाती लागल्याचे समजते. नोटांची मोजदाद करण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याच्या दोन मशीन मागवाव्या लागल्या. रामोड यांच्या कार्यालयात पाच तासांची कारवाई करत सीबीआयने त्यांना अटक केली. रामोड हा पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त म्हणून काम पाहत होता. त्याच्याबाबत काही दिवसांपासून येत असलेल्या लाचखोरीच्या तक्रारींनंतर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने केली होती तक्रार

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील भूसंपादन प्रकरणात नव्याने मोबदला देण्याच्या उद्देशाने रामोड याने लाचेची मागणी केली होती. 

संबंधित शेतकऱ्याने सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानंतर रामोड याला शुक्रवारी 8 लाखांची लाच घेताना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 

दरम्यान, रामोडने आतापर्यंत किती मालमत्ता जमा केली, याची चौकशी करण्यासाठी पथकाने रामोड याच्या विधानभवन येथील कार्यालय आणि क्विन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान व बाणेर येथील घरावर एकाचवेळी छापे मारले. 

सुमारे 30 अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होता.

14 स्थावर मालमत्तांची कागदपत्र
पुण्यातील तीन ठिकाणी आरोपींच्या अधिकृत आणि निवासी जागेवर झडती घेण्यात आली आहे. त्यामध्ये 6 कोटी (अंदाजे) रुपये सापडले. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर असलेल्या 14 स्थावर मालमत्तांसह मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे सापडलीत. गुंतवणूक आणि बँक खाते तपशील आणि इतर दोषी दस्तऐवजावरून ही जप्तीची कारवाई केली आहे. अटक आरोपींना उद्या शिवाजीनगर, पुणे (महाराष्ट्र) येथील सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

सीबीआयने रंगेहाथ पकडले

चार दिवसांपूर्वी तक्रारदाराने तक्रार केली होती. संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर 8 लाख रुपयांची लाच घेताना अनिल रामोड सापडले. सीबीआयने त्यांना रंगेहाथ पकडले. अनिल रामोड यांच्या औंध-बाणेर परिसरातील ऋतुपर्ण सोसायटीतील बंगल्यावरही सीबीआयने छापेमारी सुरू केली. सीबीआयने बड्या अधिकाऱ्याला अटक केल्याने मोठी खळबळ उडाली. सीबीआयमधील डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here