गुरुविद्या प्रतिष्ठानतर्फे मानद पुरस्कार जाहीर, बसव जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

सोलापूर दि.२९:- जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त गुरुविद्या प्रतिष्ठानच्या वतीने बसव जयंती निमित्त विविध कार्यक्रम आणि मानद पुरस्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सोमशेखर भोगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूरात बसव जयंती गुरूविद्या प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे चार दिवस साजरी करण्यात येत आहे.
दि. ३ मे रोजी बसव जयंती निमित्त कौतम चौक येथे सकाळी ८:३० वाजता महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

दि. ४ मे रोजी मोफत कान, नाक, घसा शिबीर चंडक मुनोत हॉस्पिटल पुर्व मंगळवार पेठ येथे सकाळी ठीक ९:०० वाजता सिध्देश्वर सहकारी बॅंकेचे नरेंद्र गंभीरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी प्रांतपाल लायन डॉ नारायणदास चंडक, डॉ श्री गिरीश चंडक, झोन चेअरमन लायन डॉ राहुल चडंक तसेच डॉ वासंती मुनोत यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

दि.५ मे रोजी सोलापूरात विविध क्रीडा शिबीर विविध भागात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
दि. ६ मे रोजी समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे दुपारी ०३:४५ वाजता अक्कमहादेवी महिला मंडळ वतीने गीत संध्या कार्यक्रम तसेच समाजातील विविध प्रतिष्ठित व्यक्तीना मानद पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी एकूण निवड समितीने आठ व्यक्तीचे निवड करण्यात आली आहे.

पुरस्काराचे मानकरी

पुरस्काराचे मानकरी तिपण्णा कामण्णा कोळी (मानद बसव भुषण पुरस्कार), रमेश रेवणसिध्दपा बसुदेपाटील (मानद बसव श्री पुरस्कार), हिराचंद दत्तात्रय धुळम ( मानद बसव रत्न पुरस्कार), विजयालक्ष्मी कलमेश हिंरडगी पुणे ( मानद बसव श्री पुरस्कार), सौ.सुजाता सिध्दाराम शिंगारे (मानद बसव शरणी पुरस्कार), श्रीमती चन्नमा संगप्पा केलूर( मानद बसव माता पुरस्कार), अन्नपूर्णा गौरीशंकर नरोणे ( मानद बसव भक्त शरणी पुरस्कार ), औदप्पा ओगसिध्द पुजारी, कविता औदप्पा पुजारी ( मानद बसव शरण दांपत्य पुरस्कार) यांना श्री रेणुक शिवाचार्य स्वामीजी मद्रूप यांच्या शुभहस्ते, सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते आणि अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर नागणसुरे, उपाध्यक्षा राजश्री तडकासे, उत्सव समिती अध्यक्षा रेणुका हब्बू , सचिवा श्रीदेवी यळमेली, संस्थापक अध्यक्ष सोमशेखर भोगडे, सल्लागार मोहन भूमकर यांच्या उपस्थिती राहणार आहे.

यावेळी पत्रकार परिषदेस विजू भोगडे, दत्तात्रय जामदार, अरूणा हणमगाव, नर्मदा मिठ्ठा, नमिता थिटे, शिवलीला भोगडे, सुर्यकांत राजूरे यांची उपस्थिती होती. वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित बसव भक्त उपस्थित राहावे असे प्रतिष्ठान वतीने आवाहन करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here