hijab controversy: हिजाबशी संबंधित आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी २ पोलिसांचे निलंबन

0

दि.१२: hijab controversy: हिजाबशी (Hijab) संबंधित आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी राजस्थानच्या (Rajasthan) दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित पोलिस एएसआय सतवीर सिंह आणि कॉन्स्टेबल रमेश जयपूरमध्ये तैनात होते. दोघांवर हिजाबशी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप आहे. अशा प्रकरणांमध्ये झिरो टॉलरन्सचा अवलंब करून तत्काळ कारवाई केली जाईल, असे पोलिस आणि प्रशासनाचे म्हणणे आहे.

जयपूरच्या चकसूच्या कस्तुरी देवी शाळेत हिजाबवरून वाद मिटल्याचा दावा प्रशासन करत आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, शाळा आणि मुस्लिम विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांमध्ये एक करार झाला आहे. शाळेच्या गेटपर्यंत मुली हिजाब घालून येऊ शकतात, असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यानंतर त्यांना हिजाब काढून शाळेच्या ड्रेसमध्येच वर्गात जावे लागेल. पोलिस ठाण्यात शाळाचालक आणि मुस्लिम समाजातील लोकांमध्ये हा करार झाला.

शाळा व्यवस्थापनाचा कट असल्याचा संशय

हिजाबच्या वादात शाळा व्यवस्थापनाने विचारपूर्वक डावपेच आखल्याची भीती व्यक्त केली आहे. शाळा व्यवस्थापनानुसार, पूर्वी मुली हिजाब घालून येत नव्हत्या, मात्र अचानक १५ मुली हिजाब घालून शाळेत येऊ लागल्या. नकार दिल्याने त्यांचे पालकही त्यांच्या पाठोपाठ शाळेत पोहोचले. हिजाब घालून शाळेत येणाऱ्या मुलींचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकण्यात आला. त्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. जयपूरमध्ये शुक्रवारी मोठ्या संख्येने मुस्लिम महिला जमल्या होत्या आणि त्यांनी हिजाबच्या समर्थनार्थ रॅली काढली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here