सोलापूर,दि.15: विनयभंग प्रकरणी संगणक अभियंत्यास उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेला संगणक अभियंत्याची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.
याप्रकरणी हकीकत अशी की, पीडिता ही तिच्या शाळेतील वॉशरुमकडे हात धुण्यासाठी जात असताना आरोपी स्वप्नील राऊत, रा. सोलापूर याने तिचा पाठलाग करुन पीडितेला नाव व कुठे राहते असे विचारुन पीडिता ही पहिल्या मजल्यावर जात असताना तिचा विनयभंग केला अशा आरोपावरुन संगणक अभियंता स्वप्नील राऊत यास फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली होती. आरोपीनी दाखल केलेल्या जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळला होता.
विनयभंग प्रकरण संगणक अभियंत्यास उच्च न्यायालयात जामीन मंजूर
त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केलेला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर झाली. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकुन न्यायमूर्तींनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला व आरोपीची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. विलासीनी बालसुब्रमण्यम यांनी तर सरकारतर्फे अनामिका मल्होत्रा यांनी काम पाहिले.