मुंबई,दि.१५: Cobra Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. अंगावर काटा आणणारे व्हिडिओ व्हायरल होतात. असाच एक सोशल मीडियावर नागाचा सर्वात खतरनाक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घरात असलेल्या पाळीव प्राण्यांशी लोक मनोरंजनासाठी मस्ती करतात. पण काही माणसं चक्क नागासोबत खेळ करून जीव धोक्यात टाकत असतात. अशाच प्रकारचा एक भयानक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या नागाला फकडून त्याच्या फण्यावर किस केल्यानं एका व्यक्तीला जन्माची अद्दल घडली. विषारी सापाशी पंगा घेतल्यानं काही क्षणातच नागाने जे काही केलं, ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. नागाचा हा खतरनाक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाला आहे.
नागाला पकडून त्याच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न केला अन्… | Cobra Viral Video
नागाच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती नागाला पकडून त्याच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न करतो. व्हिडीओ बनवून प्रकाशझोतात येण्यासाठी तो व्यक्ती चक्क नागाच्या फण्यावर किस करतो. मात्र, नागाच्या फण्याला स्पर्ष करताच तो नाग त्या व्यक्तीच्या तोंडावर चावा घेतो. चावा घेतल्यावरही तो व्यक्ती बिंधास्तपणे त्या नागासोबत पुन्हा जीवाचा खेळ करण्याचा प्रयत्न करतो. नागाला किस करण्याचा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून हा खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नागाचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत नागाला किस करणाऱ्या व्यक्तीचा समाचार घेतला आहे.
जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणजे नाग. दक्षिण-पूर्व आशियात खतरनाक नाग आढळतात. नाग चावल्यावर वेळेवर उपचार न घेतल्यास माणसाचा मृत्यू होतो. त्यामुळे नागाच्या जवळ जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं असतं. जंगलात फिरताना वन्य प्राण्यांसह विषारी सापांपासून चार हात लांब राहण्याच्या सूचन वनविभागाकडून दिल्या जातात. मात्र, काही लोक नियमांचं उल्लंघन करून स्वत:चा जीव धोक्यात टाकत असतात.