सोलापूर,दि.30: महाराष्ट्र शासनाने राज्यातील शाळा सुरू कर यासंदर्भात निर्देश दिले आहेत. 1 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याचे राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार शहरातील शाळा संदर्भात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे.
शासन परिपत्रक दि. 07/07/2021 व दि. 10/08/2021 नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह उपरोक्त संदर्भिय शासन परिपत्रकामध्ये नमूद अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन दि.01/12/2021 पासून इ. 1 ली ते 7 वी वर्ग सुरु करणेबाबत शासन परिपत्रक दिनांक 29/11/2021 अन्वये कळविण्यात आलेले आहे. सदर शासन परिपत्रकाचे सुलभ अवलोकन होऊन दि. 01/12/2021 इ. 1 ली ते 7 वी वर्ग सुरु करणेत यावेत असे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
शाळा पूर्वतयारी मार्गदर्शक सूचना:
- आपल्या शाळेजवळील UPHC सेंटरला पत्रव्यवहार / संपर्क करुन सर्व संबंधित शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांचे 100%
लसीकरण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे.
- सर्व वर्गखोल्या सर्व स्वच्छतागृहे व संपूर्ण शालेय परिसर निर्जंतुकीकरण करुन घेणे.
- शाळेत उपस्थित राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे लेखी संमतीपत्र जमा करुन घेणे.
- शाळेतील प्रत्येक वर्गाचे वेळापत्रक वेगवेगळे करणे. उदा. इ.1 ली चा वर्ग स.8.00 वा बोलावला असल्यास इ. 2 री चा वर्ग 7.45/8.15 ला बोलवावा सोडतानाही असेच करणे आवश्यक आहे.)
- वेळापत्रकानुसार कोणतीही मधली सुट्टी ठेवू नये। सुट्टीत विद्यार्थी एकत्र येतील म्हणून सुट्टी टाळणे आवश्यक आहे.
- शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक-पालक संघाची बैठक घेऊन सर्व बाबींची सविस्तर चर्चा करुन शंकानिरसन करणे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जनजागृती करणे.
7 शाळेसमोरील खुल्या जागेत 2 मीटर अंतरावर वर्तुळ चौकोन आखणे.
- शाळास्तरावर आवश्यकतेनुसार कार्यगट आपत्ती व्यवस्थापन समिती तयार करणे, हेल्थ क्लब स्थापन करणे तसेच शाळेमध्ये आवश्यकतेनुसार सॅनिटायजर, थर्मलगन, पल्स ऑक्सिमीटर ठेवणे महत्त्वाचे मो क्र हेल्पलाईन क्रमांक दर्शनी भागावर लिहिणे.
- एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविणे व त्याची तीच जागा कायम ठेवणे.
- वर्गात व शालेय परिसरात सर्वांनीच मास्कचा वापर करणे.
- सर्व विदयार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी शाळेच्या वेळेत पूर्णवेळ मास्कचा वापर करावा
- विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेत तसेच शाळेच्या परिसरात वावरताना नेहमीच किमान 06 फूट शारिरीक अंतर ठेऊन आंतरक्रिया करावी आणि त्या अनुषंगाने उपक्रमाचे वेळापत्रक व बैठक व्यवस्थेचे नियोजन करावे.
- सर्व वर्गखोल्या, दरवाजे, हँडल, खिडक्या, हँडरिल, टेबल, बॅच, स्वच्छतागृहाचे दररोज निर्जंतुकीकरण करावे.
- भविष्यात शाळेमध्ये एखादा विदयार्थी/शिक्षक/कर्मचारी कोविड 19 संशयित / POSITIVE आढळल्यास अ.जवळच्या UPHC च्या वैदयकीय अधिकारी यांना कळवून संबंधितांस UPHC सेंटर मध्ये दाखल करावे. तसेच जवळच्या कोविड सेंटरची माहिती मुख्याध्यापक व शिक्षकाच्या मोबाईलमध्ये/ शाळेच्या दर्शनी भागात ठेवण्यात यावी.
ब. सर्व शाळा व परिसर चांगल्या प्रकारे निर्जंतुकीकरण करुन घ्यावा, लसीकरण पूर्ण न झालेल्या शाळेतील
सर्व शिक्षकांची RTPCR चाचणी करुन कोविड-19 चा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरच संबंधितास शाळेत उपस्थितीची परवानगी दयावी. तद्नंतर अशा शिक्षकांचे लसीकरण करुन घ्यावे.
क. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अहवाल POSITIVE असतील त्यांनी डॉक्टरांकडून कोविड NEGATIVE असलेबाबतचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच संबंधितांनी शाळेत उपस्थित रहावे.
संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
ड. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अहवाल NEGATIVE आहेत, त्यांनी शाळेत उपस्थित राहताना कोविड-19 च्या
इ. दरम्यानच्या कालावधीत विदयार्थ्याचे शिक्षण खंडीत होणार नाही, यासाठी ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन करावे.