Home महाराष्ट्र पंचांगकर्ते मोहन दाते यांचे आवाहन; १९ मार्चला ‘या’ मुहूर्तावर करा गुढीपूजन

पंचांगकर्ते मोहन दाते यांचे आवाहन; १९ मार्चला ‘या’ मुहूर्तावर करा गुढीपूजन

0
पंचांगकर्ते मोहन दाते

सोलापूर,दि.१८: ब्रह्मदेवाने सृष्टीला चालना दिलेला आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला जाणारा ‘गुढीपाडवा’ आहे असे सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते  यांनी सांगितले. यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी साजरा होणार आहे. पंचांगकर्ते मोहन दाते यांनी यावर्षी गुढी उभारण्याच्या वेळेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

सूर्योदयाला गुढी उभारू नका

दरवर्षी आपण सूर्योदयाला गुढी उभारतो, परंतु यंदा तसे न करता ती सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनंतर उभारावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा सुरू होण्यापूर्वी असलेली अमावास्या सकाळी ६:५४ पर्यंत असणार आहे. त्यामुळे शास्त्रानुसार अमावास्या संपल्यानंतरच नवीन वर्षाचे स्वागत आणि गुढीपूजन करणे उचित ठरेल.

संवत्सरारंभ आणि पूजन

या दिवशी हिंदू नववर्षाचा म्हणजेच संवत्सराचा आरंभ होत असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. मोहन दाते यांनी सांगितले की, “या दिवशी पंचांगस्थ गणपतीचे पूजन, गुढी पूजन आणि गुढी उभारणे हे सर्व विधी सकाळी ६:५४ नंतर करावेत.”

थोडक्यात महत्त्वाचे:

• तारीख: १९ मार्च २०२६ (चैत्र शुद्ध प्रतिपदा)

• वेळ: सकाळी ६:५४ नंतर गुढी उभारावी.

• विशेष: संवत्सरारंभ आणि पंचांगस्थ गणपती पूजन.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.