G9: ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

0

सोलापूर,दि.30: G9: भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार 8 ऑक्टोबर 2024 रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेत्याला प्रदान केला जाईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अभिनेत्याचा सन्मान करण्याची घोषणा केली आहे.

G9: मिथुन चक्रवर्ती यांना सन्मानित करण्यात येणार

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले मिथुन दा यांच्या सिनेमॅटिक प्रवासाने प्रत्येक पिढीला प्रेरणा दिली आहे. दादासाहेब फाळके निवड ज्युरीने मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे हे जाहीर करताना मला सन्मान वाटतो. 

G9

पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला | Mithun Chakraborty

मिथुनचा चित्रपटसृष्टीतील प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे देऊन चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. कोलकाता येथे जन्मलेला मिथुन हा व्यवसायाने अभिनेता, निर्माता आणि राजकारणी आहे. अभिनेता 350 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसला आहे. यामध्ये हिंदी, बंगाली, तमिळ, भोजपुरी, तेलुगू, कन्नड, पंजाबी चित्रपटांचा समावेश आहे. मिथनने 1977 मध्ये ‘मृगया’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here