ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलावर प्राणघातक हल्ला

0

अकोला,दि.29: ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर हल्ला करण्यात आला आहे. पृथ्वी देशमुख यांच्यावर अकोल्यात हल्ला झाला आहे. सराईत गुंडांनी पृथ्वी यांच्यावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. अकोला शहरातील सिव्हील लाईन पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा प्रकार घडला. यामुळे शहरात खळबळ उडाली.

या हल्ल्यानंतर नितीन देशमुख यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते अकोला पोलीस ठाण्यात जमले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचीदेखील माहिती मिळत आहे. संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आला आहे.

पृथ्वी देशमुख हे कपड्याच्या दुकानाजवळ उभे असताना सराईत गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि पळ काढला. आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर हल्ला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या संख्येने शिवसैनिक पोलीस स्थानकात दाखल झाले. हल्ला करणारे सर्वजण कृषीनगर भागातील रहिवासी असल्याचे कळते.

दरम्यान, या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी स्वत: आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही तत्काळ पोलीस स्थानकाकडे धाव घेतली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here