सोलापूर,दि.24: सोलापूर आगाराच्या ताफ्यात सध्या चार इलेक्ट्रिक बस दाखल झाले आहेत. या सर्व बस सोलापूर ते स्वारगेट या मार्गावर मार्गस्थ होत आहेत. या इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांचा प्रवास हा आरामदायक आणि सुखकर होईल अशा अपेक्षा सोलापूर आगार प्रमुख विनोद भालेराव यांनी व्यक्त केली.
सोलापूर एस.टी. स्थानकावरून शनिवारपासून इलेक्ट्रीक बससेवा सुरू करण्यात आली आहे. सोलापूर ते पुणे मार्गावर पहिली बस विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांच्या हस्ते ध्वज दाखविल्यानंतर मार्गस्थ झाली.
सोलापूर एसटी महामंडळाच्या ताफ्यात चार इलेक्ट्रिक बस दाखल
एस. टी. महामंडळानं आता इलेक्ट्रीक बसचा वापर करणं सुरू केलं आहे. सोलापूर डेपोसाठी अशा 5 बसेस दाखल झाल्या आहेत. यातील हि पहिली ई-बस सोलापूर-पुणे-सोलापूर मार्गावर मार्गस्थ झाली आहे. लवकरच मंगळवेढा, पंढरपूर, अक्कलकोट मार्गावरही या बसेस धावतील. पर्यावरणपुरक अशी हि बस आहे.
काल पहिल्या दिवशी 7 महिला प्रवाशांनी या बसमध्ये प्रवास करत कर्मचाऱ्यांसमवेत सेल्फी घेतला. यावेळी आगार व्यवस्थापक उत्तम जुंधळे, विभागीय अधिकारी अजित पाटील याचबरोबर विवेक लोंढे, सदाशिव कदम, बसवेश्वर काळजाते, गोपाळ धोत्रे, महेंद्र तावरे, सुर्यकांत कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते.