अहमदाबाद,दि.22: Flood In Gujarat: पावसामुळे महापूर आला आहे. शहरांमध्ये पाणी घुसल्यामुळे गायी, गाड्या गेल्या वाहून गेल्या आहेत. गुजरातमध्ये पावसाची संततधार सुरू असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जुनागढ आणि नवसारीत पावसामुळे महापूर आला असून घरांमध्ये पाणी शिरले आहे. इथले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुराच्या पाण्याचा प्रवाह जोरदार असून यात जनावरे, गाड्या वाहून जात आहेत.
Flood In Gujarat: पावसामुळे महापूर शहरांमध्ये घुसले पाणी
नवसारी जिल्ह्यात चार तासात 13 इंच पावसामुळे पूर आला आहे. सखल भागात घरांमध्ये पाच फुटांपर्यंत पाणी भरलं आहे. रस्ते बंद झाल्यानं संपर्क तुटला आहे. गिरनार आणि दातार पर्वतावर मुसळधार पाऊस असल्यानं कालवा नदीचे पाणी पात्राबाहेर पडलं आहे. हवामान विभागाने आज भावनगर, नवसारी आणि वलसाडमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.
जुनागढमध्ये बुधवारी सकाळपासून मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जुनागढमध्ये सकाळी 6 ते 8 या वेळेत मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे पुराची स्थिती आहे. बुधवारी जुनागढ जिल्ह्यात मांगरोळमध्ये 8.9 इंच पाऊस झाला. मालियाहाटिनात 6.2 इंच, वेरावलमध्ये 4.2 इंच तर सुत्रपाडामध्ये 2.7 इंच पावसाची नोंद झाली.