सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिक विम्याचा लाभ मिळणार

0

सोलापूर दि.13: प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामान अधारित फळपिक विमा योजना सन 2021-22 अंतर्गत मृग बहार 2021 मध्ये पुर्नरचित हवामान अधारित फळपिक विमा योजना सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये फळपिक विमा भरलेल्या 16868 शेतकऱ्यांना मिळणार विमा रक्कम मिळणार आहे. त्याबाबत रिलायन्य जनरल इन्शुरन्स प्रा.लि.कंपनीने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय सोलापूर.यांना कळविलेले असुन त्यानुसार अंदाजीत शेतकरी संख्या 16868 व रक्कम रुपये 1897.86 लक्ष फळपिक विमा शेतकऱ्यांना मिळणार असलेबाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर यांनी कळविले आहे. लवकरच खालील प्रमाणे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

तालुका निहाय शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे रक्कम मिळणार आहे.अक्कलकोट तालुक्यातील 18 शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाख 62 हजार रूपये, बार्शी तालुक्यातील 107 शेतकऱ्यांना 15 लाख 05 हजार रूपये, करमाळा तालुक्यातील 65 शेतकऱ्यांना 10 लाख 49 हजार रूपये, माढा तालुक्यातील 79 शेतकऱ्यांना 10 लाख 44 हजार रूपये, माळशिरस तालुक्यातील 604 शेतकऱ्यांना 77 लाख 38 हजार रूपये, मंगळवेढा तालुक्यातील 4350 शेतकऱ्यांना 460 लाख 75 हजार रूपये, मोहोळ तालुक्यातील 29 शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार रूपये, पंढरपुर तालुक्यातील 610 शेतकऱ्यांना 61 लाख 04 हजार रूपये, सांगोला तालुक्यातील 10985 शेतकऱ्यांना 1256 लाख 06 हजार रूपये, दक्षिण सोलापूर तालुक्यातील 21 शेतकऱ्यांना 2 लाख 43 हजार रूपये


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here