ED notice to Jayant Patil: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

0

मुंबई,दि.11: ED Notice to Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.जयंत पाटील यांना सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाकडून आज निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्वांचं लक्ष त्या निकालाकडे लागलेलं असताना जयंत पाटील यांना नोटीस आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

जयंत पाटील यांना नोटीस, काय आहे प्रकरण? | ED Notice to Jayant Patil

आयएल आणि एफएस (IL & FS) या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. ईडीने नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडीची नोटीस येणं हे काही नवीन राहिलेलं नाही

राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडीची नोटीस येणं हे काही नवीन राहिलेलं नाही. यापूर्वी जयंत पाटलांना ईडीकडून कोणतीही नोटीस आलेली नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनाही त्रास देण्याचं काम भाजपनं सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे. या चौकशीतून काहीही समोर येणार नाही. अशा नोटीसा अनेक नेत्यांना आलेल्या आहेत, असंही विद्या चव्हाण म्हणाल्या. तसेच, अशा नोटीसा शरद पवारांपासून अनेक नेत्यांना अशा नोटीसा आल्या आहेत. त्यामुळे या नोटीसांमुळे राष्ट्रवादी कमकुवत होण्याऐवजी आणखी भक्कम होत आहे, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना IL&FS प्रकरणी ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. 2018 मध्ये याचप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. जयंत पाटील यांना सोमवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवारी जयंत पाटील चौकशीसाठी हजर राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here