सोलापूर,दि.२२: Dr. Shirish Valasangkar | डॅा. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध न्युरोसर्जन डॅा. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी (दि.१८) आत्महत्या (Shirish Valasangkar Suicide) केली होती. स्वतःवर गोळी झाडून घेत डॅा. वळसंगकर यांनी आत्महत्या केली होती. डॉ. वळसंगकर यांनी एक चिट्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप केला होता.
मनीषा मुसळे-माने यांना अटक करण्यात आली होती. त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र डॅा. वळसंगकर यांच्या आत्महत्येला मनीषा कारणीभूत नसून या प्रकरणी डॅा. वळसंगकर यांच्या आत्महत्येचे दुसरेच कारण असल्याचे समोर येत आहे.
दैनिक सकाळ सोलापूरने डॅा. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात जवळच्याच एका नातेवाईककडून त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचे वृत्त दिले आहे. दैनिक सकाळच्या वृत्तानुसार डॅा. शिरीष यांच्या जवळच्याच एका नातेवाईककडून गेल्या दीड वर्षांपासून त्यांचे खच्चीकरण करण्यात येत होते. त्यांना पदोपदी अवमानित करण्यात येत होते. त्यांच्या शब्दाला त्यांच्या दवाखान्यात किंमत राहिली नव्हती.
वयाने छोटी असलेली नातेवाईक व्यक्ती डॉ. शिरीष यांच्यावर तीन वेळा धावून गेली होती. एकदा गालावर xxx. हे सर्व ते सहन करत होते. ज्या व्यक्तीला त्यांनी प्रशासकीय पदापर्यंत पोहोचवले त्या मनीषा माने यासुद्धा त्या नातेवाईकाच्या हातातील बाहुले बनल्या होत्या. यामुळे या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. लवकरच याबाबत पोलिसही चौकशी करून दोषींवर कारवाई करतील.