Dolly Dcruz Death: गेल्या काही वर्षांत सिनेसृष्टीने अनेक तारे गमावले आहेत. आता बातमी अशी आहे की प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्री ‘गायत्री’ उर्फ ‘डॉली डिक्रूझ’चे (Dolly Dcruz) निधन झाले आहे. बातमीनुसार, गायत्रीचा कार अपघातात (Accident) मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, होळी पार्टीवरून परतत असताना तिच्या कारला अपघात झाला. ती एका मित्रासोबत प्रवास करत होती. हैदराबादमधील गाचिबोवली येथे त्यांची कार दुभाजकावर धडकली. यात गायत्रीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा मित्र राठोड हिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायत्रीचा मित्र राठोड कार चालवत होता. तर, हैदराबादच्या गाचीबोवली भागात त्यांच्या कारला अपघात झाला. कार वेगात होती आणि राठोडचे गाडीवर असलेले नियंत्रण सुटले. कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकून गाडी पलटली. हा अपघात इतका भीषण होता की गायत्रीचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात राठोडला गंभीर दुखापत झाली, त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तिथे मृत घोषित केले. काही रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की, कार रस्त्यावर चालत असलेल्या एका महिलेला धडकली. त्यानंतर कार डिव्हायडरला धडकून पलटली. तर कारने ज्या महिलेला धकड दिली ती महिला गाडीच्या खाली सापडली आणि त्या महिलेचा गायत्रीप्रमाणे जागीचा मृत्यू झाला.
गायत्री ही फक्त 26 वर्षांची होती. गायत्री इन्स्टाग्राम आणि यूट्यूबमुळे बरीच चर्चेत असायची. ‘जलसा रायडू’ असे तिच्या यूट्यूब चॅनलने नाव आहे. सोशल मीडियावरील वाढत्या लोकप्रियतेनंतरच गायत्रीला ‘मॅडम सर मॅडम अंते’ या वेबसिरीजची ऑफर मिळाली. या वेबसीरिजमुळे गायत्री चांगलीच चर्चेत आली होती. याशिवाय गायत्री उर्फ अनेक शॉर्ट फिल्म्समध्येही दिसली.