सोलापूर,दि.१: Dilip Sopal-Manoj Jarange Patil: शिवसेना (ठाकरे गट) नेते आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आमदार दिलीप सोपल यांनी पूर्वीपासूनच मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सुरू केले आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे प्रणेते व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. रविवारी या आंदोलनाला पाठिंबा देत बार्शीचे आमदार अॅड. दिलीप सोपल यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. (Dilip Sopal-Manoj Jarange Patil News)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मोठ्या स्वरूपात हे आंदोलन सुरू आहे. बार्शीचे आमदार अॅड.दिलीप सोपल यांनी रविवारी सकाळी मराठा योद्धा जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तसेच आमदार कैलास पाटील यांनी आदी उपस्थित होते.
आरक्षण विषयावर चर्चा करून अॅड.सोपल यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. मागील महिन्यात या अनुषंगाने आमदार सोपल यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन आरक्षणावर चर्चा केली होती.