Dhirendra Shastri On Sai Baba: धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे साईबाबांवर वक्तव्य म्हणाले, “गीदड की खाल ओढकर…”

0

मुंबई,दि.२: Dhirendra Shastri On Sai Baba: धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबा यांच्यावर वक्तव्य केलं आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज (Dhirendra Krishna Shastri) यांनी संत तुकाराम (Sant Tukaram) महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केलं होते. संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची, असा दावा धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केला होता. “संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले.

संत तुकाराम महाराज म्हणाले की, देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली. मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते.” असे धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणाले होते.

शिर्डीचे संत साईबाबा यांच्यावर वक्तव्य | Dhirendra Shastri On Sai Baba

नुकतंच त्यांनी शिर्डीचे थोर संत साईबाबा यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमात शास्त्री यांना सवाल करण्यात आला की, साई बाबांची पूजा करावी की करू नये? यावर शास्त्री म्हणाले, गीदड की खाल ओढकर कोई शेर नही बन सकता (गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही.) यावेळी शास्त्री यांनी साई बाबांना ईश्वर मानन्यास नकार दिला.

जबलपूरमध्ये धीरेंद्र शास्त्री भगवत गीतेचं पारायण करत होते. काल (१ एप्रिल) या पारायणाचा शेवटचा दिवस होता. यावेळी शास्त्री आणि जमलेल्या लोकांमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी एका व्यक्तीने शास्त्री यांना साई बाबांबद्दल प्रश्न केल्यावर शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.

शास्त्री म्हणाले की, आमच्या धर्माचे शंकराचार्य यांनी साई बाबांना ईश्वराचं स्थान दिलेलं नाही. शंकराचार्य यांचं मत मानणं अनिवार्य आहे. त्यांच्या मताचं पालन करणं प्रत्येक सनातनी व्यक्तीचं कर्तव्य आहे. कारण ते धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असोत अथवा दुसऱ्या त्यांना ईश्वराचं स्थान देता येणार नाही.

साई बाबा हे संत आहेत, ईश्वर नाही | Dhirendra Shastri

शास्त्री म्हणाले की, कोणतेही संत ते तुलसीदास असतील, सूरदास असतील किंवा इतर कोणतेही ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते ईश्वर नाहीत. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. परंतु मी हे बोलणंदेखील गरजेचे आहे की, गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही. याला लोक वादग्रस्त वक्तव्य म्हणतील पण हे बोलणं खूप गरजें आहे. आपण साईबाबांना संत म्हणू शकतो, फकीर म्हणू शकतो, पण ईश्वर नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here