“भक्ती आणि शक्तीमुळे संकटे नाहीसी होतात” प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार

0

सोलापूर,दि.२६ सध्या मानवाच्या जीवनाला अस्थिरता घेरल्याने निर्णय क्षमता कमी होत आहे. असा अनुभव येतो आहे. पण जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या बळावर आपण निश्चितपणे ध्येय साध्य करु शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर येथील अनुजा बेडगे या ग्रंथालयीन कर्मचारी असलेल्या युवतीचे देता येईल. अत्यंत अडचणीच्या असलेल्या श्री केदारनाथ दर्शनासाठी तिने सुमारे बावीस कि.मी.चे अंतर आपल्या बाळाला पाठीवर घेऊन चालत जाऊन पूर्ण केले आहे.

अनुजाला आजच्या युगातील झाशीची राणी म्हटले तर वावगे वाटणार नाही अशी जिद्द बाळगणाऱ्या तरुण तरुणीची समाज व्यवस्था बळकट करण्यासाठी गरज असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी ग्रंथालय कर्मचारी संघटना पुणे विभाग यांच्या वतीने आयोजित अनुजा बेडगे यांच्या सत्कार समारंभात केले.

सत्काराच्या प्रारंभी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अनुजा बेडगे यांचा शाल, ग्रंथ व पोशाख देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल धोंडिराम जेऊरकर यांनी केले.

अध्यक्षीय समारोप करताना सुनील पारगुंडे म्हणाले की, धाडसाने काम करा यश आपोआप मिळेल यावेळी अनुराधा बेडगे, धनश्री बेडगे, धोंडिराम ‌‌‌जेवूरकर, गिरीश मठपती, सदाशिव बेडगे, सुनील पारगुडे, अरिहंत रत्नपारखे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रंथपाल अरिहंत रत्नपारखे यांनी केले कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here