मुंबई,दि.26: Shiv Sena MLA disqualification: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvwekar) यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होत आहे. एकूण दाखल झालेल्या 34 याचिकांचे सहा गट तयार केले असून सहा याचिकांची आज सुनावणी पार पडत आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून दाखल झालेल्या चार आणि शिवसेना शिंदे गटाकडून दाखल झालेल्या दोन याचिकांचा समावेश आहे. आजच्या सुनावणीची सुरुवात ठाकरे गटाने केलेल्या अर्जावरील युक्तिवादाने झाली.
यावेळी झालेल्या युक्तिवादावेळी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या सुनवणीदरम्यान, मी सर्वोच्च न्यायालयाचं ऐकायचं की, स्वत: निर्णय घ्यायचा, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या वकिलांना सुनावलं.
सुनावणीत काय झालं?
सर्व अपात्रता याचिकांवर पुराव्यांची गरज नसल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे : शिंदे गटाचे वकील
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार नव्याने पुरावे सादर करण्याची गरज नाही, असेही ठाकरे गट अर्जात बोलत आहेत – शिंदे गटाचे वकील
पण हे त्यांचे म्हणणे आहे, आम्हाला वाटते काही पुरावे सादर करण्याची गरज आहे – शिंदे गटाचे वकील
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे वाचन शिंदे गटाचे वकीलांनी वाचन केले
अपात्रता संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षाना असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे – शिंदे गटाचे वकील
14 दिवसांची मुदत द्या आम्हाला काही पुरावे सादर करायचे आहेत – शिंदे गटाच्या वकिलांची मागणी
सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांच्या संदर्भात दिलेल्या निकालाचा दाखला शिंदे गटाच्या वकिलांनी दिला
कायद्यानुसार प्रक्रिया पाहिली तर आम्हाला पुरावे सादर करण्याची परवानगी मिळावी – शिंदे गटाचे वकील
जगजीतसिंह यांच्या प्रकरणाचा अभ्यास केला असता, याठिकाणी होणाऱ्या सुनावणीत पुरावे सादर करण्यास दिले तर कायद्याचे उल्लंघन होणार नाही ना? – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा सवाल
हे प्रकरण सरसकट सर्वच प्रकरणांत लागू होत नाही , त्यातील काही मुद्दे घटनांनुसार लागू होऊ शकतात – शिंदे गटाचे उत्तर
मी जगजीतसिंह प्रकरणातील ठराविक माहिती सादर केली आहेत. त्यातील इतर माहिती मुद्द्यांनुसार वेगळी आहे. माझ्या प्रकरणात जे मुद्दे त्या प्रक्रियेनुसार आहेत, त्याचा दाखला आम्ही देत आहोत – शिंदे गटाचा युक्तिवाद
उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख नियुक्तीवर शिंदे गटाकडून आक्षेप
21 जून 2018 रोजी झालेल्या कार्यकारणी बैठकीत ही निवड झाल्याचे सांगितले जात असले तरी त्या दिवशी अशी कुठलीही बैठक झाली नसल्याचा शिंदे गटाचा दावा
शिंदे गटाचा युक्तीवाद
मुख्य राजकीय पक्ष कोण?
कोण व्हीप जारी करु शकतं?
व्हीप कसा लागू होऊ शकतो?
व्हीप देण्याचं माध्यम काय?
हे प्रश्न पाहायला हवे
त्याचे पुरावे द्यायला हवेत
शिंदे गटाच्या वकिलांकडून तब्बल दीड तास युक्तीवाद केल्यानंतर आता ठाकरे गटाचे वकिलांचा युक्तिवाद सुरु झाला.
आता अचानक पुरावे सादर करण्याची जाग त्यांना आली आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे हे उल्लंघन – ठाकरे गटाचे वकिल
मी कुणाचे ऐकायचे आहे …सुप्रीम कोर्टाचे ऐकायचे की स्वतःच्या अधिकारात निर्णय घ्यायचा – विधानसभा अध्यक्ष नार्वेकर
सुप्रीम कोर्टाने फक्त प्रथमदर्शी चौकशी करण्याचे संकेत दिलेत. पूर्णपणे पुरावे बघण्याची तुम्हाला गरज नाही- ठाकरे गट वकिल
सुप्रीम कोर्टाने तुम्हाला लक्ष्मणरेखा आखून दिलीय. त्यातच तुम्हाला निर्णय द्यायचा आहे- ठाकरे गट वकिल
सत्तांतर काळात काय काय झाले, तेवढ्या कालावधीपुरतेच तुम्हाला पहायचे आहे. राजकीय पक्षाची संरचना काय आहे हे आता विचारत घ्यायची गरज नाही. शिंदे गटाची याचिका पूर्णपणे बेकायदेशीर आहे.तुम्ही कोणता असा निर्णय घेवू नका की ज्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होईल – ठाकरे गट वकिल
भ्रष्टाचार झाला आहे. हे कारण मविआ सरकार पाडण्यासाठी ग्राह्य कसे धरता येईल- ठाकरे गट वकिल
तुमची काय भूमिका आहे हे नियमपुस्तिकेमध्ये सांगितले आहे. नियम पुस्तिकेत न्यायाधिकरणाचे अधिकार सांगितले आहेत. – ठाकरे गट वकिल
उदय सामंत यांची सही असलेल्या ठाकरे गटाच्या याचिकेचा आधार शिंदे गटाकडून घेतला जात आहे. उदय सामंत नंतर शिंदे गटाकडे आले होते. मग ते स्वतःची सही असलेल्या याचिकेवर कसा काय आक्षेप घेवू शकतात – ठाकरे गट वकील
उदय सामंत यांची दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. एका याचिकेत ते म्हणतात की उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत आणि दुसरीकडे म्हणतात की ते पक्षप्रमुख नाहीत. हा काय घोळ आहे. – ठाकरे गट वकील