Corona | भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

0
Corona

मुंबई,दि.२१: Corona | भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या तीन लाटेत देशात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. देशातील रुग्णांची संख्या 257 वर पोहोचली आहे. कोरोनाचा नवा सब-व्हेरिएंट JN.1 आला आहे. महाराष्ट्रातही कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे. राजधानी मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

कोरोना सब-व्हेरिएंट JN.1 

कोरोना सब-व्हेरिएंट JN.1 ला जागतिक आरोग्य संघटनेनं व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट अर्थात विशेष लक्ष ठेवण्याची गरज असलेला प्रकार म्हणून घोषित केलं आहे. सुदैवानं या रुग्णांमध्ये लक्षणं सौम्य असून, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज भासलेली नाही. भारतातील परिस्थिती नियंत्रणात आहे. (Corona News)

Corona
Corona

लसीकरण झाल्यामुळे… | Corona Vaccination

राज्यात कोरोना काहीसा वाढलेला दिसत असला तरी घाबरण्याचे कारण नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) झाल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढलेली आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. सध्या आरोग्य विभागाकडून स्थितीचा आढावा घेतला जात असून राज्य शासन सर्व आजारांचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here