सुरत,दि.20: Congress Leader Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) अडचणीत वाढ झाली आहे. मोदी आडनावाच्या मानहानीप्रकरणी राहुल गांधींना सुरत कोर्टाने झटका दिला आहे. मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरोधातील राहुल गांधींचा अर्ज सुरत कोर्टाने फेटाळला आहे. सुरत कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात राहुल गांधी आता हायकोर्टात दाद मागणार आहेत.
सुरतच्या सत्र न्यायालयात याआधी हे प्रकरण 13 एप्रिल रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता.
काय आहे प्रकरण? | Congress Leader Rahul Gandhi
राहुल गांधींवरील खटल्याचे प्रकरण 2019 मध्ये बंगळुरू येथे निवडणूक रॅलीदरम्यान राहुल गांधींनी केलेल्या विधानाशी संबंधित आहे. प्रत्येक चोराचे आडनाव मोदी का असते, असे राहुल गांधी सभेत म्हणाले होते. या वक्तव्यावर गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी मानहानीचा दावा दाखल केला. यावर्षी 23 मार्च रोजी न्यायालयाने पूर्णेश मोदी यांच्या याचिकेवर निकाल दिला आणि दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली.