सोलापूर,दि.२०: सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. Video व्हायरल झाला आहे. सोलापूर येथील काॅंग्रेस भवनात रविवारी सकाळी कार्यकर्त्यांमध्ये जाेरदार हाणामारी झाली. शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या वादावर अखेर पडदा पडला.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काॅंग्रेस भवनात अभिवादन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नराेटे, प्रवक्ते प्रा. अशाेक निंबर्गी यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित हाेते.
काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, Video व्हायरल
या कार्यक्रमाला उपस्थित असलेलेल्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना काॅंग्रेस उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे आणि सुभाष वाघमारे यांच्यात हमरी-तुमरी झाली. आमदार प्रणिती शिंदे कार्यक्रम संपवून काॅंग्रेस भवनातून बाहेर पडल्या. कार्यक्रम संपताच बंदपट्टे यांच्या सहकाऱी आणि वाघमारे यांच्यात हाणामारी झाली. कार्यकर्ते हाणामारी करीत काॅंग्रेस भवनात ओरडू लागले. अखेर शहराध्यक्ष चेतन नराेटे आणि प्रा. अशाेक निंबर्गी यांनी हस्तक्षेप केला आणि वाद थांबविला.