Chhattisgarh: भीषण अपघातात लहान मुलासह ६ जणांचा मृत्यू; २० जण जखमी

0

रायपूर,दि.१५: Chhattisgarh: भीषण अपघातात लहान मुलासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगढच्या बलौदा बाजारात भीषण अपघाताची दुर्घटना घडली. येथील रायपूर-बलौदा बाजार राष्ट्रीय महामार्गवर ट्रक आणि पिकअप वाहनाची धडक बसली. या दुर्घटनेत एका चिमुकल्यासह ६ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

मुलासह ६ जणांचा मृत्यू | Chhattisgarh

पलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडा पुलिया येथे ही अपघातीच दुर्घटना घडली. मृतांमध्ये ५ महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. पिकअपमधील लोक छठीचा कार्यक्रम उरकून परत येत होते. त्याचवेळेस जोरदार वेगात आलेल्या ट्रकने पिकअपला धडक दिली. त्या दुर्घटनेत २० जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळीस शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

दरम्यान, यापूर्वी ३ मे रोजी छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडली होती. त्या अपघातात एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू झाला होता. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here