Car Accident: कारच्या भीषण अपघातात नवरदेवासह एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू

0

कोटा,दि.20: कारच्या भीषण अपघातात (Car Accident) नवरदेवासह (groom) एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. नवरदेवासह लग्नाला जाणाऱ्या कुटुंबावर काळानं घाला घातल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नाला जात असताना झालेल्या भीषण अपघातात नवरदेवासह एकाच कुटुंबातील नऊ जणांचा करुण अंत झाला आहे. रात्रीच्या सुमारास चारचाकी गाडी नदीत पडल्याने (car fell into river) नाका तोंडात पाणी शिरून सर्वांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. सर्व मृतदेह बाहेर काढले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित घटना राजस्थानातील (Rajasthan) कोटा (Kota) जिल्ह्यात घडली आहे. कोटा जिल्ह्यातील नयापुरा येथील एका पुलावरून अनियंत्रित कार चंबळ नदीत कोसळून हा भीषण अपघातात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी घटनास्थळी आसपास कोणीच नव्हतं. त्यामुळे कारमधील कोणालाही वाचवता आलं नाही.



रविवारी सकाळी अपघाताची माहिती मिळताच बचाव दलासह पोलीस पथक घटनास्थळी दाखलं. शोधमोहीम राबवून नदीत बुडालेल्या सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंब शनिवारी सायंकाळी बरवाडा येथून कारने उज्जैनकडे जात होते. या कारमध्ये एकाच कुटुंबातील 9 लोक होते. यामध्ये नवरदेव देखील होता. दरम्यान कारचा वेग अधिक असल्याने आणि अंधारामुळे कालव्याची काठ न दिसल्याने कार थेट नदीत कोसळली.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लासह मंत्र्यांकडून शोक व्यक्त

ही भीषण अपघाताच्या घटनेची माहिती समोर येताच राजस्थान सरकारचे मंत्री शांती धारीवाल यांनी शोक व्यक्त केला आहे. यासोबतच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे. त्याचबरोबर बचावकार्य आणि तपासाला गती देण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here