बंगळुरु,दि.6:Bus stop stolen: अख्खा बस स्टॉप चोरीला गेल्याची घटना घडली. विशेष म्हणजे ही चोरीची घटना भारतात घडली आहे. सोन्याची चेन, दागिने, घड्याळ, मोबाइल या महागड्या वस्तुंची चोरी होते, हे आपण ऐकून होतो. पण बस स्टॉप चोरीला गेल्याच तुम्ही कधी ऐकलय का? हो भारतातल्या एका राज्यात हे घडलय, चोरट्यांनी अख्ख्याच्या अख्खा बस स्टॉप चोरला, मागे काही सोडलं नाही. महत्त्वाच म्हणजे आठवड्याभरापूर्वी हा बस स्टॉप सुरु झाला होता. नागरिक या ठिकाणाहून बस पकडायचे. आडोशाला उभे रहायचे. या बस स्टॉपची महागडी किंमत फक्त चोरट्यांच्या लक्षात आली. त्यांनी अख्खा बस स्टॉपच पळवला.
बंगळुरुच्या कनिनघम रोडवर हा बस स्टॉप होता. बंगळुरु महानगर वाहतूक प्राधिकरण (BMTC) कडून बस स्टॉप संचलित व्हायचा. एन रवी रेड्डी यांनी बस स्टॉप चोरी झाल्याची तक्रार नोंदवली. BMTC बस स्टॉप बांधण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीचे ते उपाध्यक्ष आहेत. त्यांनी 30 सप्टेंबरला तक्रार नोंदवली. कनिनघम रोडवरील चोरी झालेल्या या बस स्टॉपची किंमत 10 लाख रुपये आहे. सर्व स्टील चोरांनी पळवलं.
बंगळुरु शहरातील बस स्टॉप चोरीला | Bus stop stolen
मार्च महिन्यात तीन दशकापूर्वीचा HRBR लेआऊट रोडवरील बस स्टॉप एकारात्रीत गायब झाला होता. कल्याण नगर येथील बस स्टॉप लायन्स कल्बने 1990 साली डोनेट केला होता. व्यावसायिक आस्थापनेसाठी हा बस स्टॉप हटवण्यात आला होता. बस स्टॉप हटवला असेल, तर ते काम बृहत बंगळुरु महापालिकेच आहे, असं बंगळुरु महानगर वाहतूक प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं. 2015 साली होरायझन शाळेजवळचा दुपानाहाली बस स्टॉप एकरात्रीत गायब झाला होता.