Bolero Accident: बोलेरो कालव्यात कोसळली, ११ जणांचा मृत्यू

0

सोलापूर,दि.३: Bolero Accident: बोलेरो कालव्यात कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. इटियाथोक पोलीस स्टेशन परिसरात दर्शनासाठी जाणारी बोलेरो गाडी अनियंत्रित होऊन कालव्यात उलटल्याने हा अपघात झाला. बोलेरोमध्ये एकूण १५ जण होते, त्यापैकी ११ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले. ही घटना घडली तेव्हा सर्व लोक दर्शनासाठी निघाले होते. (UP Accident)

११ जणांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी | Bolero Accident

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडा जिल्ह्यातील इटियाथोक पोलीस स्टेशन परिसरातील राहरा गावात ही घटना घडली. बोलेरोमधील सर्व लोक दर्शनासाठी जात होते. मुसळधार पावसामुळे कार अनियंत्रित झाली आणि कालव्यात पडली. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, तर चार जण गंभीर जखमी आहेत. (Accident News)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे आणि मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासकीय पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here