भाजपाने राहुल गांधी यांचा व्हिडीओ शेअर करत केला गंभीर आरोप

0

मुंबई,दि.६: भाजपाने राहुल गांधी यांचा व्हिडीओ शेअर करत गंभीर आरोप केला आहे. भाजपाने व्हिडीओ शेअर करत कार्यकर्त्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावा केला आहे. भाजपाने भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी कुत्र्याला दिलेले बिस्किट कार्यकर्त्यांला दिले असा आरोप केला आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओदेखील भाजपने शेअर केला आहे.

यापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरही कार्यकर्त्यांसंदर्भात अपमानास्पद भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष खर्गे जी यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यासोबत केली होती आणि इकडे राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यात एका कुत्र्याला बिस्किट देत आहेत. मात्र कुत्र्याने ते बिस्किट खाल्ले नाही, यानंतर त्यांनी तेच बिस्किट त्यांच्या एका कार्यकर्त्याला दिले.’

एवढेच नाही तर, “ज्या पक्षाचा अध्यक्ष आणि युवराज आपल्या कार्यकर्त्यांसोबत कुत्र्यासारखा व्यवहार करत असतील तर, असा पक्ष लुप्त होणे स्वाभाविक आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here