सोलापूर,दि.9: Bijju Pradhane Solapur: राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत यांच्या जाधव राजीनाम्यावर अद्याप निर्णय झाला नसला तरी नवीन अध्यक्ष नियुक्तीसाठी पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे खा. शरद पवार यांनी महाविकासआघाडी सरकार सत्तेत असताना सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यादृष्टीने त्यांनी महेश कोठे यांना जवळ करत सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती.
महेश कोठे यांनी भाजपाचे बिज्जू प्रधाने, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, काँग्रेसचे माजी महापौर यु एन बेरीया, माजी महापौर नलिनी चंदेले, तौफीक शेख यांना पक्षात आणत राष्ट्रवादीची ताकद वाढवली. कोठे यांना सोलापूर महापालिकेची जबाबदारी दिल्यानंतर राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष बदलणार अशी चर्चा होती. दुसरीकडे शहराध्यक्ष भारत जाधव यांना या पदावर बरीच वर्षे झाली होती. त्यामुळे नवीन शहराध्यक्ष नेमण्याच्या हालचाली सुरूच होत्या. अखेर भारत जाधव यांनी शहराध्यक्षपदाचा राजीना दिला आहे.
त्यामुळे नवीन शहराध्यक्षपदासाठी बिज्जू प्रधाने, यु.एन. बेरिया आणि सुधीर खरटमल आणि यांचे नाव चर्चेत आली आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही नेते दुसऱ्या पक्षातून राष्ट्रवादीत आले आहेत. सुरूवातील कोठे यांनी सुधीर खरटमल यांच्या नावाची शिफारस वरिष्ठांकडे केली होती. पण खरटमल लोकसभा निवडणुकीसाठी जास्ती इच्छुक आहेत तसे त्यांनी बोलूनही दाखवले आहेत. त्यामुळे आता अचानक शहराध्यक्ष पदासाठी बिज्जू प्रधाने यांचे नाव समोर येत आहे.
बिज्जू प्रधाने यांचे नाव चर्चेत | Bijju Pradhane Solapur
प्रधाने हे युवा नेते आहेत. त्यांच्यामागे युवकांची मोठी फळी आहे. राष्ट्रवादीच्या प्रवेशावेळी त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. शिवाय ते भाजयुमोचे सरचिटणीसही होते, दोन वेळा महापालिका निवडणूकही लढवली आहे. त्यामुळे त्यांचा फायदा राष्ट्रवादीला निश्चित होईल. असे गृहीत धरून त्यांच्या नावाच पक्ष विचार करत असल्याचे समजते.