नवी दिल्ली,दि.29: सुशिक्षित बेरोजगारांसाठी रेल्वे विभागात नोकरीची मोठी संधी आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र सरकारीची नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे यासाठी फार जास्त शिक्षणाची देखील काही गरज नाहीये. मग उशीर कशाला करता? आजच करा अर्ज आणि मिळवा थेट सरकारी नोकरी. उत्तर पूर्व रेल्वेमध्ये थेट नोकरी करण्याची संधी आहे. भरती प्रक्रियेला देखील सुरूवात झालीये. तब्बल 1100 पेक्षाही अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. मग काय आजच करा अर्ज. देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही या भरती प्रकियेसाठी अर्ज करू शकता.
उत्तर पूर्व रेल्वे विभागात अप्रेंटिस या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेत तुम्ही अर्ज करू शकता.http://ner.indianrailways.gov.in या वेबसाईटला भेट द्या आणि लगेचच अर्ज करा. तसेच या भरती प्रक्रियेसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती या वेबसाईटवर मिळू शकते. 24 डिसेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटीची तारीख असणार.
ही भरती प्रक्रिया 25 नोव्हेंबरपासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी ओबीसी आणि EWS च्या उमेदवारांसाठी शंभर रूपये फिस आहे. जर तुम्ही या पदासाठी अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे मान्यता प्राप्त बोर्डाचे दहावी पासचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकत नाहीत.

फक्त दहावी पासच नाही तर यासोबतच तुमच्याकडे संबंधित आयटीआय ट्रेडचे प्रमाणापत्र असणे अनिवार्य आहे. या दोन गोष्टींशिवाय तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत. ज्यावेळी तुम्ही अर्ज करणार त्यावेळी तिथे मागितलेली सर्व माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. अर्जानंतर रेल्वेकडून या भरती प्रक्रियेसंदर्भातील अपडेट वेबसाईटवर टाकले जातील.
खरोखरच थेट रेल्वेमध्ये काम करण्याची दहावी पास असलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे. केंद्र सरकारची नोकरी थेट तुम्ही करू शकता. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 1100 जागांसाठी होत आहे. अर्ज करण्याची देखील अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे. लक्षात ठेवा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 डिसेंबर आहे.
Sachin
Job aplay