वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय, या मतदार संघाकरिता यांना पाठिंबा

0

मुंबई,दि.2: वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय घेतला आहे. नांदेड, परभणी, पुणे, बारामती, शिरूर आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघासाठी वंचितने मोठा निर्णय घेतला आहे. आज आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत वंचितने पाच मतदारसंघांतील आपले उमेदवार जाहीर केले.

वंचितने नांदेड लोकसभा मतदार संघात अविनाश भोसीकर तर बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसंच पुण्यातून वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी घोषित केली आहे.

शिरूरमधून वंचितने मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली आहे. मंगलदास बांदल हे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र मागील काही दिवसांपासून ते भाजपच्या स्टेजवर दिसत होते. तसंच त्यांनी नुकतीच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती.

परंतु आता वंचित आघाडीने त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. शिरूरमध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना रंगत असताना आणखी एका उमेदवाराची एंट्री झाल्याने शिरूरची लढत तिरंगी होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here