आमदार प्रणिती शिंदे यांचा कोविड लसचा उल्लेख करत मोठा दावा

0

सोलापूर,दि.17: काँग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोविड लसचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे. कोरोना काळात केंद्र सरकारने लोकांनी कोविड लस घ्यावी याकरिता अनेक अभियान राबवले होते. कोविड लस भारतीयांना मोफत देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर सर्व राजकीय पक्षांनी बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने आपल्याला मारण्यासाठी भाजपाला 100 कोटी रुपये दिले, टेंन्शन नका घेऊ तुमच्या जीवावर पैसे कमावण्यासाठी सरकारने व्हॅक्सिन विकत घेतल्या असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

सरकार व्हॅक्सिन घेण्यासाठी जबरदस्ती करत होते. स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इलेक्ट्रोरोल बाँडची माहिती जाहीर केली आहे. याचाच आधार घेत प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारने ज्यांनी ज्यांनी भाजपाला पैसे दिले त्यांना टेंडर दिल्याचे सांगितले. कोरोना काळात सीरम इन्स्टिट्यूटकडून सरकारने लस विकत घेतल्या होत्या.

काँग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत कोविड काळात लोकांना जबरदस्तीनं लस घ्यायला लावली. त्या लसीमुळे अनेकांना शुगर, बीपी आणि हृदयविकाराचा त्रास सुरू झाला असा दावा केला.

प्रणिती शिंदे म्हणाल्या सीरमने इन्स्टिट्यूटन् भारतीय जनता पार्टीला 100 कोटी रुपये दिले. त्यामुळे केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीचं टेंडर दिले. कोविड लसीमुळे अनेकांना शुगर, बीपीचा त्रास झाला त्यामुळे मी लस घेतलीच नाही असंही त्यांनी जाहीर सांगितले. त्याचसोबत सरकारने लोकांना कोरोना लस घेण्यासाठी जबरदस्ती केली. त्यामुळे आज कुणाला काही ना काही दुखणे सुरू झाले. ज्यांना काहीच नव्हतं अशांनाही रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार चालू झालेत असा गंभीर आरोप त्यांनी केला. 

केंद्र सरकारवर आमदार प्रणिती शिंदे यांनी जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून देशात महागाई वाढली, वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होते. मात्र उलट बेरोजगारी वाढली, असे शिंदे म्हणाल्या. व्हॅक्सिन प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो होता, त्यामुळे मी व्हॅक्सिन घेतले नाही असे त्या म्हणाल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here