नवी दिल्ली,दि.13: आज 13 हा आकडा भाजपसाठी शुभ होताना दिसत नाही. आज 13 तारीख असून 13 जागांचे निकाल जाहीर होत आहेत. पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. बंगालमध्ये टीमएमसीने 4 पैकी 3 जागा जिंकल्या असून चौथ्या जागेवर आघाडीवर आहे. तर उत्तराखंडमध्ये काँग्रेसने बद्रीनाथची जागा जिंकली असून मंगळूरच्या जागेवर आघाडीवर आहे.
हिमाचलच्या देहरा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांनी विजयाची नोंद केली आहे. त्याचवेळी पंजाबमधील जालंधर पश्चिम मतदारसंघात आम आदमी पक्षाने विजय मिळवला. येथे आपचे उमेदवार मोहिंदर भगत 37,325 मतांनी विजयी झाले आहेत. पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड , पंजाब, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूच्या 13 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल काही तासांतच जाहीर होतील.
सात राज्यांमधील विधानसभेच्या 13 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार मुसंडी मारली असून, 13 पैकी 11 ठिकाणी इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर भाजपाला केवळ 1 जागा जिंकता आली असून, सध्या एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे.
पश्चिम बंगालमधील 4, हिमाचल प्रदेशमधील 3, उत्तराखंडमधील दोन आणि मध्य प्रदेश, बिहार, पंजाब आणि तामिळनाडूमधील एक अशा मिळून 13 जागांसाठी निवडणूक झाली होती. बंगालमध्ये टीमएमसीने 4 पैकी 3 जागा जिंकल्या असून चौथ्या जागेवर आघाडीवर आहे.