“बारामतीतील सहकारी साखर कारखाने हे शरद पवार यांनी आणलेले नसून…” अजित पवार

0

बारामती,दि.20: बारामती लोकसभा मतदार संघात नणंद-भावजय यांच्यात लढत होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत होणार. शरद पवार यांच्यासोबत अख्ख पवार कुटुंब प्रचारात सहभागी झाले आहे. पवार कुटुंबीयांकडून अजित पवार यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारही शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत.

बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते प्रचारात उतरले आहेत. दुसरीकडे बारामतीमध्ये शुक्रवारी सुप्रिया सुळेंनी नारळ वाढवत प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांच्याही प्रचाराचा नारळ फुटला आहे. प्रचाराच्या पहिल्याच सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांसह रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

“ही गावकी भाऊकीची किंवा नणंद भावजयची निवडणूक नाही. देशाच्या 135 कोटी जनतेचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक सासू-सुनेची, नणंद भावजयीची निवडणूक नाही. ही भावकीची निवडणूक नाही ही मोदी साहेब आणि राहुल गांधींची निवडणूक आहे. माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जातात. पण त्यांच्या आरोपामुळे मला काय भोकं पडत नाही. बारामतीची जनता मला अनेक वर्षे ओळखते. माझं लहाणपण येथेच गेलंय,” असे अजित पवार म्हणाले.

साखर कारखाने हे शरद पवार यांनी आणलेले नसून…

“कालच्या शरद पवारांच्या सभेत अमेरिका टाईम्सचा पत्रकारासह अनेक पत्रकार मंडळी आली होती. यावेळी शरद पवार खुर्चीवर बसले होते. तर सुप्रिया, रोहित आणि युगेंद्र पायापाशी बसले होते. अख्ख कुटुंब जवळ घेऊन बसले होते होते. म्हणजे हे अमेरिकेतही पोहोचलं की बघा कुटुंब कसं एक आहे. पण मी त्यांच्याबरोबर होतो तेव्हा साहेब एकेठिकाणी बसले असतील तर मी दुसरीकडे बसायचो. बारामतीतील सहकारी साखर कारखाने हे शरद पवार यांनी आणलेले नसून ते त्या त्या भागातील जुन्या जाणत्या व्यक्तींना आणल्या आहेत,” असं प्रत्युत्तर अजित पवारांनी शरद पवारांना दिलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here