दि.25 : बँकेत काही कामं असतील तर ती पूर्ण करून घ्यावी लागतील. सप्टेंबर महिना संपत आहे. ऑक्टोंबर महिन्यात बँकांना 21 दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे बँकेची कामं तुम्हाला सुट्ट्यांची यादी पाहून करून घ्यावी लागतील. पुढील महिन्यात नवरात्र, दसरा या सणासमारंभानिमित्त बराच काळासाठी बँका बंद राहणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात जवळपास 21 दिवस बँका बंद असतील.
बँकेत तुमचे एखादे काम असेल आणि बँकेला सुट्टी असेल तर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. त्यामुळे त्याआधी कोणत्या दिवशी बँकांना सुट्ट्या आहेत हे जाणून घ्या. या बँक हॉलिडेमुळे तुमच्या बँकिंगविषयीच्या कामात अडथळा येऊ शकतो. अर्थात प्रत्येक राज्यानुसार बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये (upcoming bank holidays list) वेगवेगळे असतात, कारण काही सण-समारंभ असे असतात की जे ठराविक राज्यातच साजरे केले जातात. ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जारी केली जाते.
सुट्ट्यांची यादी
ऑक्टोबर 1 – गंगटोकमे ध्यबँक खाती अर्धवार्षिक बंद करणे
2 ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती (सर्व राज्ये)
3 ऑक्टोबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
6 ऑक्टोबर – महालय अमावस्या (आगरतळा, बंगळुरू, कोलकाता)
7 ऑक्टोबर – लेनिंगथौ सनमही (इम्फाळ) चे मेरा चाओरेन हौबा
9 ऑक्टोबर – दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
10 ऑक्टोबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
12 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (महा सप्तमी) / (आगरतळा, कोलकाता)
13 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (महा अष्टमी) / (आगरतळा, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोलकाता, पाटणा, रांची)
14 ऑक्टोबर – दुर्गा पूजा/दसरा महा नवमी/आयुथा पूजा (आगरतळा, बंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, पाटणा, रांची, शिलाँग, श्रीनगर, तिरुअनंतपुरम)
15 ऑक्टोबर – दुर्गा पूजा/दसरा/विजया दशमी/(इम्फाळ आणि शिमला वगळता सर्व बँका)
16 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (दसैन)/ (गंगटोक)
17 ऑक्टोबर – रविवार
18 ऑक्टोबर – काटी बिहू (गुवाहाटी)
19 ऑक्टोबर-ईद-ए-मिलाद/ईद-ए-मिलादुन्नबी/मिलाद-ए-शेरीफ (पैगंबर मोहम्मद यांचा वाढदिवस)/बारावफाट/(अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू, कानपूर, कोची , लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर, तिरुअनंतपुरम)
20 ऑक्टोबर-महर्षी वाल्मिकी यांचा वाढदिवस/लक्ष्मी पूजा/ईद-ए-मिलाद (आगरतळा, बंगळुरू, चंदीगड, कोलकाता, शिमला)
22 ऑक्टोबर – ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू, श्रीनगर) नंतर शुक्रवार
23 ऑक्टोबर – चौथा शनिवार
24 ऑक्टोबर – रविवार
26 ऑक्टोबर – प्रवेश दिवस (जम्मू, श्रीनगर)
31 ऑक्टोबर – रविवार