मुंबई,दि.1: Bank Holiday March: आज मार्च महिन्याचा पहिला दिवस आहे. दरम्यान आज आपण बँकांना या महिन्यात किती सुट्ट्या आहेत हे पाहणार आहोत. या महिन्यात तब्बल 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयने ही यादी जारी केली आहे.
तुम्ही या महिन्यात बँकांमध्ये काही महत्त्वाची कामं करण्याचा विचार करत असाल तर आत्ताच ही यादी पाहणं गरजेचं आहे.
मार्च महिन्यात किती दिवस बँका राहणार बंद : 3 मार्च चापचर कुट, 5 मार्च रविवार, 7 मार्च होळी / होळी (दुसरा दिवस) / होलिका दहन / धुलंडी / डोल जत्रा, 8 मार्च धुलेती / डोलजात्रा / धुलिवंदन / याओसांग दुसरा दिवस. अशा सुट्ट्या आहेत.
9 मार्च होळी, 11 मार्च महिन्याचा दुसरा शनिवार, 12 मार्च रविवार, 19 मार्च रविवार, 22 मार्च गुढी पाडवा, 25 मार्च शनिवार, 26 मार्च रविवार, 30 मार्च 2023 श्री राम नवमीची सुट्टी असणार आहे.
राज्यांनुसार बँकांच्या सुट्ट्या या वेगवेगळ्या असतात. RBI नुसार, सर्व राज्यांच्या सुट्ट्यांची यादी वेगळी आहे. या सुट्ट्यांची संपूर्ण यादी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलीये. ज्यामध्ये राज्यांनुसार विविध सण आणि सुट्ट्यांची संपूर्ण माहिती देण्यात आलीये.