Bank Holiday 2023: बँका फेब्रुवारी महिन्यात इतके दिवस राहणार बंद

Bank Holiday 2023: देशभरातील बँका 10 दिवस बंद राहतील

0

मुंबई,दि.30: Bank Holiday 2023: बँकेत कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर कॅलेंडर बघूनच जा. दोन दिवसांमध्ये जानेवारी महिना संपणार आहे. पुढील आठवड्यापासून फेब्रुवारी महिना सुरू होईल आणि पहिल्या तारखेलाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सामान्य अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2023) सादर करतील. फेब्रुवारी महिन्यात देशभरातील बँका 10 दिवस बंद राहतील. (Bank Holiday) यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्या तसेच रविवारच्या बँकेच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात बँकेत कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असल्यास सुट्ट्यांची यादी पाहूनच घराबाहेर पडा. चालू आर्थिक वर्ष संपायला फारसा वेळ उरलेला नाही. त्यामुळे पुढील महिन्यापासून बँकांमध्येही गर्दी पाहायला मिळू शकते.

दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार बँक बंद असतात… | Bank Holiday

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या यादीनुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये देशभरातील बँका 10 दिवस बंद राहतील. यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँका सुरू असतात. रिझव्‍‌र्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, विविध राज्यांमध्ये होणारे सण आणि कार्यक्रमांनुसार बँक सुट्ट्या असतील. बँकांच्या सुट्ट्यांच्या दिवशी तुम्ही इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करु शकता.

सुट्ट्यांची यादी | Bank Holiday 2023

-5 फेब्रुवारी – रविवार(देशभरातील बँका राहतील बंद

-11 फेब्रुवारी- दुसरा शनिवार (देशभरातील बँका राहतील बंद)

-12 फेब्रुवारी- रविवार(देशभरातील बँका राहतील बंद)

-15 फेब्रुवारी- लुई-नगाई-नी (मणिपुरमधील बँका बंद)

-18 फेब्रुवारी- महाशिवरात्री (बेंगळुरू, हैदराबाद, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, तिरुवनंतपुरम, -अहमदाबाद, बेलापूर मधील बँका राहतील बंद)

-19 फेब्रुवारी- रविवार(देशभरातील बँका राहतील बंद)

-20 फेब्रुवारी- राज्य दिवस, (अरुणाचल प्रदेश आणि मिजोरम)

21 फेब्रुवारी- लोसर, (सिक्किम)

-25 फेब्रुवारी- चौथा शनिवार (देशभरातील बँका राहतील बंद)

-26 फेब्रुवारी- रविवार (देशभरातील बँका राहतील बंद)

बँकिंग संबंधित काम ऑनलाइन हाताळू शकता

बँकेच्या सुट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमध्ये होणाऱ्या इतर कार्यक्रमांवरही अवलंबून असतात. म्हणजेच, राज्य आणि शहरांमध्ये सुट्ट्या विविध दिवशी असतात. बँकांच्या शाखा बंद असल्या तरीही, तुम्ही घरबसल्या बँकिंग संबंधित काम ऑनलाइन हाताळू शकता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here