सोलापूर,दि.19: महावितरणाच्या प्रधान तंत्रज्ञाला मारहाण प्रकरणात न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे. डी.पी. बंद केलेच्या कारणावरुन सोलापूर दिनांक :09 / 02 / महावितरणच्या प्रधान तंत्रज्ञाला मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आरोपी सिध्दप्पा शरणप्पा उटगे, रा. भंडारकवठा, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर यास अटक करण्यात आली होती.
महावितरणाच्या प्रधान तंत्रज्ञाला मारहाण प्रकरण
यात हकिकत अशी की, फिर्यादी हे महावितरण चे प्रधान तंत्रज्ञ असून, त्यांनी शेतातील डि. पी. बंद केला या कारणास्तव आरोपी ने त्यांना लाथा बुक्याने मारहाण करुन वरिष्ठांकडे तुझी तक्रार करुन तुझी नोकरी घालवतो अशी धमकी दिली. अश्या आशयाची फिर्याद फिर्यादीने मंद्रुप पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानुसार आरोपीस अटक करण्यात आली होती.
सदर प्रकरणात आरोपीचे वकिल ॲड. अभिजीत इटकर यांनी असा युक्तीवाद केला की, फिर्यादी हा घटनेवेळी कोणतेही सरकारी काम करत नव्हता. त्यामुळे सदरची घटना ही सरकारी कामात अडथळा म्हणता येणार नाही हा युक्तीवाद ग्राहय धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश पाटवदकर यांनी सदर आरोपीची जामिनावर मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. संतोष आवळे, ॲड. राम शिंदे, ॲड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.