पिंपरी चिंचवड,दि.22: Bachchu Kadu On Modi Govt: आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रातील सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी आणि ग्राहकांचं हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने कांद्याबाबत हा निर्णय घेतलाय, असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केलीय. कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करतं. मग दर पडल्यानंतर सरकार हस्तक्षेप का करत नाही? अशा शब्दात कडू यांनी केंद्र सरकारला सवाल केलाय. केंद्र सरकारने कांद्या निर्यातीवर 40 % कर लावला आहे. त्यावर बोलताना बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलंय. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.
केंद्र सरकारवर टीका | Bachchu Kadu On Modi Govt
सरकार खाणाऱ्यांचा विचार करतं. पण शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा विचार करत नाही. ही नालायक प्रवृत्ती असल्याची टीका त्यांनी केली आहे. कांदा परवडत नसेल तर खावू नये म्हणता माझ्याकडे लसूण आहे. मुळाही आहे, अशा शेलक्या शब्दात कडू यांनी सरकारवर टीका केलीय.
कांदा खाल्ला नाही म्हणून कुणी मरणार आहे का? असा सवाल ही त्यांनी व्यक्त केला. कांदा प्रश्नावरून अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं. म्हणून तुम्ही एवढे घाबरता का? असा सवाल करताना बच्चू कडू यांनी सरकारला केला आहे. शिवाय केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मंत्री विजयकुमार गावित यांनी सौंदर्यावर बोलताना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा संदर्भ दिला. यावेळी त्यांची जीभ घसरला. त्याचाही बच्चू कडू यांनी समाचार घेतला. मासे खाण्याच्या वक्तव्यावर बोलताना त्यांची तशी मानसिकता आहे. त्यामुळे ते तसे बोलले असतील, असं बच्चू कडू म्हणालेत.
खासदार नवणीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्येमध्ये विठ्ठलराव नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावरही बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली नवनीत राणा यांना धमकीच्या मुद्द्यावर बोलताना ते कोण महत्वाचे आहे का? असा प्रती सवाल करत त्यांनी केला. पिंपरी चिंचवडमध्ये दिव्यांग विभाग आपल्यादारी या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड मध्ये आले असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.