Bachchu Kadu Amravati: प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांची मोठी घोषणा

0

अमरावती,दि.13: Bachchu Kadu Amravati: प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्यांचे गुलाम राहू. मी मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मी माझा निर्णय घेणार आहे. मी 17 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटून मग 18 तारखेला माझा निर्णय जाहीर करणार आहे, असं प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी म्हटलं. अमरावतीमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Bachchu Kadu Amravati)

सरकारमधील अनेक आमदारांमध्ये मंत्रिपदावरून अस्वस्थता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा होत आहेत. मात्र, अजून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप रखडले आहे. यामुळे सरकारमधील अनेक नेते नाराज आहेत. यावर पत्रकार परिषद घेत बच्चू कडू यांनी म्हटलं की, मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय़ घेऊ नये असं म्हटलं. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर घेईन. सध्या शिंदे-फडणवीस सरकारमध्येच राहणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

बदलत्या राजकारणाचा कंटाळा आला आहे | Bachchu Kadu Amravati

आम्हाला मंत्रिपदाची हाव नाही, तसंच सध्याच्या राजकीय परिस्थितीचा कंटाळा आला असल्याचंही बच्चू कडू म्हणाले. आधीच्या मविआ सरकारमध्ये केवळ उद्धव ठाकरेंमुळे सहभागी झालो होतो. उद्धव ठाकरेंनी आम्हाला दोन अपक्ष आमदारांना पाठिंब्यासाठी विनंती केली होती आणि त्यामुळे त्यांना मी पाठिंबा दिला होता. त्यांनी राज्यमंत्रीपदसुद्धा दिलं होतं. यासाठी मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन असंही बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू म्हणाले की, “मला महाविकास आघाडीत मंत्रिपद दिल्याने मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. आम्हाला अनेकवेळा अनेकांनी आमिष दिले तरीही आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो. उद्धव ठाकरे यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं असतं तर गुवाहाटीला जाण्याची वेळ आली नसती. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्यांचे गुलाम राहू.

मुख्यमंत्र्यांनी फार विनंती केली म्हणून मी सध्या निर्णय मागे घेत आहे. काम,पद, हे तर येत राहिल. पण विश्वास जर का गेला तर तो परत येत नाही. आम्ही सामान्यांसाठी लढू शकतो, मरु शकतो पण चापलुसी करु शकत नाही. पद घेण्यापेक्षा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्री पेचात असताना त्यांना मदत करण्याचा मी निर्णय घेतला आहे. आम्हाला अजित दादा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काहीच लेनदेन नाही, असं बच्चू कडू म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here